FREE DOWNLOAD

Kavita Navache Bet

  • SEARCH TYPE
  Kavita Navache Bet icon

  Kavita Navache Bet

  by: BNM COMBINES 0 0

  FREE DOWNLOAD

  Screenshots

  Description

  एका माणसाने एका बड्या साहित्यिकाला "साहित्य लिहिण्याची योग्य वेळ कोणती?" असे विचारले. तेव्हा त्या बड्या साहित्यिकाने सांगितले की " ज्यावेळेस कागदाचा सुद्धा आवाज स्पष्ट ऐकू येईल. तिच वेळ साहित्य लिहिण्याची आहे". किती योग्य आणि मर्म शब्दात त्या साहित्यिकाने लिखाणाचे रहस्य सांगितले. पण मला असा प्रश्न पडतो की सावरकरांनी कविता कशा लिहिल्या असतील... अंदमानच्या कोठतील शांततेला शांतता म्हणता येणार नाही. ती तर भयाण शांतता... पण त्याही प्रसंगात सावरकरांनी उत्तमोत्तम काव्य लिहिले. कविता लिहिण्याला एखादी वेळ यावी लागत नाही. ज्यावेळेस कवी कविता लिहिण्यास सिद्ध असतो. तिच काव्य लिखाणाची खरी वेळ असते. कविता म्हणजे नेमकं काय? तर मला असे वाटते की कविता म्हणजे ज्यावेळेस कवी परमेश्वराशी संवाद साधतो त्यावेळेस संवादातून निर्माण होणारे संभाषण म्हणजेत कविता.

  "कविता नावाचे बेट" या काव्य संग्रहातील मला माझीच एक कविता आठवते, "तुझ्याशी संवाद म्हणजे एक प्रकारे शाब्दिक प्रणयच आणि या प्रणयमालेतून जन्माला आलेले अपत्य म्हणजेच माझी कविता"... परमेश्वराशी जो काही संवाद होतो त्या संवादातून निर्माण होणार अपत्य म्हणजेच कविता असते. परमेश्वर म्हणजेच आपल्या भोवती असलेलं निसर्ग.. अशीच जन्माला येते कविता... कविता म्हणजे कविचा श्वास, कविचा प्राण... सावरकर म्हणाले होते की "मी अंदमानात असताना दोन बायका माझ्या सोबत होत्या, एक निद्रा आणि दुसरी कविता" इतकं महत्व आहे कवितेला कवीच्या जीवनात.

  "कविता नावाचे बेट" या काव्य संग्रहात गेय आणि मुक्त छंद अशा दोन्ही प्रकारच्या कविता आहेत. विविध प्रसंगांवरुन या कविता जन्मल्या आहेत. बर्याणच कविता या प्रेम-कविता आहेत. "सावरकरांची आरती", "मी" आणि "पाळणा युगपुरुषाचा" अशा काही कविता सोडल्यास इतर कवितांचा सामान्य विषय "प्रेम" हा आहे. हा काव्य संग्रह वाचून हे माझे आत्मवृत्त आहे असा समज कृपया करुन घेऊ नये. कारण स्वतःवर उद्भवलेले प्रसंग यापेक्षा माझ्या अवती-भवती घडलेल्या प्रसंगांना काव्य-स्वरुन देण्याचा प्रयत्न केला आहे. काही व्यक्तीगत प्रसंगावरही कविता रचल्या आहेत.

  आपण सुजाण रसिकांनी याअ काव्य सग्रहाचे योग्य ते समिक्षण करावे. कारण सुरेश भट म्हणाले होते की कविता समिक्षकांसाठी नव्हे तर रसिकांसाठी लिहिल्या जातात. त्यामुळे मला असे वाटते की खरे समिक्षक आपण रसिक मंडळी आहात. आपणच या कवितेचे परिक्षण करावे. काही चुका असल्यास अधिकाराने सांगावे आणि कविता आवडल्यास पाठ थोपटवावी. कारण आपल्या पाठ थोपवण्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळत असते.. कुसुमाग्रज म्हणालेच आहेत.. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा...